शेतकरी अजूनही वंचितच

 जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी -जिल्हयात सप्टेंबर- ऑक्टोबर २०२१ महिन्यात झालेल्या नैसर्गिक पूर-आपत्ती नुकसानभरपाई निधीचे दोन टप्प्यातील अनुदानापैकी दुसऱ्या टप्प्याचे अनुदान फेबृबारीच्या सुरुवातीसच वितरीत होऊनही त्याचा लाभ अद्याप बऱ्याच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोचलेला नाही. या  २०२१ मधील पूर-नुकसान मदतीपासून शेतकरी अजूनही वंचितच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात गेल्या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा दीडपट पावसाने हजेरी लावली आहे. त्यात २०२१ सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात अतिपाउस आणि पुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकारी अभिजित राउत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, यांच्या संयुक्त पाहणीनंतर महसूल, पशुसंवर्धन, कृषी, ग्रामपंचायत प्रशासन स्तरावरून करण्यात आले होते. या नुकसानीपोटी १० ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाकडे दोन टप्प्यात अनुदान वितरण केले आहे. दिवाळीपूर्वीच पहिल्या टप्याचे अनुदान जानेवारीत तर फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहातच दुसऱ्या टप्यातील २५ टक्के अनुदान जिल्हा स्तरावरून वितरीत करण्यात आले आहे. परंतु फेब्रुवारी आणि मार्च नंतरही तालुकास्तरावरून बहुतांश शेतकऱ्याच्या बँक खात्यात उर्वरित पूर-नुकसान भरपाई रकमेचे अनुदान जमा झालेले नाही.

जिल्हा प्रशासनाकडे अधिक माहिती घेतली असता, तालुकास्तरावर पंचनामा लाभार्थी यादीनुसार तहसीलदारांच्या डीजीटल स्वाक्षरीने धनादेश बँकांकडे वितरीत झाले आहेत. तर बँक अधिकाऱ्यांनी मार्च उलटूनही पूर आणि अतिपावसाच्या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्यातील मदत अनुदान जमा झाले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यावरून अनुदान तात्काळ वितरीत होऊनही तालुकास्तरावर होत असलेल्या दिरंगाईमुळे सप्टेंबर- ऑक्टोबर २०२१च्या पूर-नुकसान मदतीच्या अनुदानापैकी दुसऱ्या टप्प्यातील मदतीपासून बहुताश शेतकरी अजूनही वंचितच  आहे.

 

 

 

 

 

Protected Content