शेकोटी विझविण्यावरून बाप-लेकाला चौघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील डिकसाई गावात शेकोटी विझविण्याच्या कारणावरून बाप-लेकाला चौघांकडून बेदम काठीने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संदीप गणेश चव्हाण (वय-३२) रा. डिकसाई ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपच्या घरासमोर गल्लीतील काही जण शेकोटी करून बसलेले होते. त्यावेळी संदीपचे वडील गणेश चव्हाण यांनी शेकोटी विझविण्याचे सांगितले. याचा राग आल्याने शेकोटीवर बसलेले अशोक बळीराम पाटील, संदीप धुडकू पाटील, शुभम सुर्यकांत पाटील आणि गुलाब बळीराम पाटील सर्व रा. डिकसाई ता.जि.जळगाव यांनी संदीप चव्हाण आणि त्यांचे वडील गणेश चव्हाण यांना काठीने चौघांनी घरात घुसून बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केली. तसेच बापलेकाला चौघांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. उपचार घेतल्यानंतर संदीप गणेश चव्हाण याने मंगळवारी १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अशोक बळीराम पाटील, संदीप धुडकू पाटील, शुभम सुर्यकांत पाटील आणि गुलाब बळीराम पाटील सर्व रा. डिकसाई ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर महाजन करीत आहे.

 

 

Protected Content