मुंबई (वृत्तसंस्था) आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४०० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. निफ्टी सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.
येस बँकेवरील संकट, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि करोना व्हायरस या तिहेरी संकटामुळे बाजार गडगडला आहे. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकाचवेळी अनेक संकटे चालून येत असल्याने शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८ हजारांच्या खाली आला होता. निफ्टी सुद्धा ११ हजारांची पातळी सोडून खाली आला होता.