शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या स्मृति दिनानिमित्त रविवार २० डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती व धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या स्मृति दिनानिमित्त रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गरूड प्राथमिक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील कोविड १९ विषाणू प्रादुर्भावामुळे रुग्णांना रक्ताची गरज भासत असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.