शेंदुर्णी प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांचे आज शेंदूर्णी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
आमदार रोहीत पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे सोबत आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा प्रभारी करण खलाटे, जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव वंदना चौधरी उपस्थित होत्या.
कजगाव येथिल सत्कार स्वीकारून पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भडगाव, नगरदेवळा व शेंदूर्णी येथिल हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार रोहीत पवार यांनी केले. पाचोरा येथील कौशल्य विकास कार्यक्रमात संबोधन केले तसेच जळगाव येथिल कार्यक्रमांना उपस्थिती असे नियोजन होते.
चाळीसगाव , पाचोरा, शेंदूर्णी, पहुर, नेरी मार्गे जळगाव दौऱ्यात रस्त्यावरील व परिसरातील सर्व गावातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आले. त्याचा स्वीकार आमदार रोहीत पवार यांनी केला. यावेळी वरखेडी येथे निर्मल पेट्रोलियम संचालक स्नेहदीप गरूड, शिवराज गरूड, विलास अहिरे, कुऱ्हाड येथील विशाल पाटील, पाळधी येथील रत्नाकर पाटील, गोंदेगाव येथिल देवानंद शिंदे, सतीश खाकरे व वरखेडी, कुऱ्हाड येथील ग्रामस्थांनी यांनी सत्कार केला.
मालखेडा ग्रामस्थांच्या वतीने माजी पं.स. सदस्य रामलाल नाईक यांनी कार्यकर्त्यां समवेत आमदार रोहीत पवार यांचा सत्कार केला तर शेंदूर्णी येथील गरूड महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील व अन्य प्राध्यापकांनी आमदार रोहीत पवारांचा सत्कार केला. शेंदूर्णी येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार रोहीत पवारांनी केले.
यावेळी डॉ.भूषण मगर,डॉ.सागर गरूड यांचे वतीने आमदार रोहीत पवारांचा सत्कार करण्यात आला. शेंदूर्णी जिनिंगचे प्रेसिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन नंदकिशोर बारी, संचालक अशोक चौधरी, राजेंद्र पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील यांनीही आमदार रोहीत पवार यांचा सत्कार केला. शेंदूर्णी येथिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार रोहीत पवार यांनी माल्यार्पण केले. तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याचे नेते व राज्य कार्यकारिणी सदस्य संजय गरूड यांच्या निवासस्थानी आमदार रोहीत पवार यांचे औक्षण व कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारून आमदार रोहित पवार यांनी अर्धातास हितगुज केले. यावेळी सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सर्वांशी चर्चा केली.
यावेळी जि.प. सदस्या सरोजिनी गरूड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव वंदना चौधरी, माजी जि.प.सदस्य सागरमल जैन, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉ.किरण सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीराम काटे, रविंद्र गुजर, अतुल बारी, हरी पाटील, जंगीपुरा ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, अरुण मोरे, भोला राजपूत, रमेश राजपूत, इच्छाराम राजपूत, जामनेर येथील संदीप हिवाळे, शुभम पांढरे, धनराज पाटील, विशाल माळी, अमोल पाटील, प्रल्हाद बोरसे, दिलिप पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.