शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता उपविभागीय दंडाधिकारी जळगाव यांनी शेंदुर्णीतील तब्बल ३७ जणांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे.
सध्या शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पहूर पोलिसांनी उपायोजना करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असलेल्या शेंदुर्णी येथील तब्बल ३७ जणांच्या विरोधात पोलिस प्रशासनाने सी.आर.पी.सी.१४४ (१) प्रमाणे प्रस्ताव तयार केला. यात शेंदुर्णी शहरातून दि. ८, ९ व १० सप्टेंबर २०२२ असे तीन दिवस हद्दपार करण्या संबंधाचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी जळगांव यांच्या कडे पाठवण्यात आला होता. याबाबतीत संबंधितांना कारणे दाखवा नोटीसा प्राप्त झाल्यामुळे आता शेंदुर्णी शहरात गुन्हे दाखल झालेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.