पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी– येथून जवळच असलेल्या शेंदुर्णी येथील बाजारपट्टा भागात सुरू असलेल्या जुजार अड्डयावर आज पहूर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून चार आरोपींना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील अंतर्गत अवैध धंदे विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत पहूर पोस्ट हद्दीत शेंदुर्णी गावात बाजार पट्टा भागात दर्ग्याच्या बाजूला शेडमध्ये काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी आपल्या सहकार्यांना निर्देश दिले. यानुसार पोलीस हवालदार भरत लिंगायत पोलीस, शिपाई अनिल देवरे, होमगार्ड जगदीश चौधरी व दीपक सावळे यांनी दुपारी चारच्या सुमारास वरील ठिकाणी छापा मारून किरण समाधान कोळी, धीरज अशोक महाजन, सागर अर्जुन धनगर व फारुख खान युनुस खान शेख यांना ताब्यात घेऊन ५७०० रुपये रोख जप्त केले. या सर्व आरोपि विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पोलिस ठाणे अंतर्गत अवैध धंदे विरोधात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व त्यांच्या सहकार्यांनी जोरदार मोहीम राबविण्यात आली असून या कारवाईमुळे पोलीस ठाण्यातील अंतर्गत सर्व गावांमध्ये अवैध धंद्या मध्ये खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांना विरोधात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युजशी बोलतांना दिली.