जळगाव, प्रतिनिधी । धर्मरथ फाऊंडेशन व अल्टरनेटिव्ह मेडिसिन सेंटरतर्फे आज रविवार दि.२ ऑगस्ट रोजी शिवाजी नगर मारुती मंदिर येथे 10 वी व 12 वी परीक्षेत ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
शिवाजी नगर प्रभागमाधील असे विद्यार्थी ज्यांनी गरीब परिस्थितीला मात करून काम करून 10 वी व 12 वीमध्ये अतिशय उत्तम मार्क मिळवले अश्या विद्यार्थीच्या सत्कार धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला. शासनाच्या सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन त्या विद्यार्थीचा प्रशस्तीपत्र, आसार्निक अलब्मच्या गोळ्या, आयुर्वेदिक काढा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जेणे करून त्यांना प्रेरणा मिळून भावी वाटचालीस एक उभारी मिळेल. हाच दृष्टीकोण ठेऊन हा कार्यक्रम आयोजित केला गेला.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दयाल.आर. तोष्णीवाल, जयंत पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका गायत्री शिंदे, संदीप ठाकूर, माजी नगरसेवक अंकुश कोळी, मझहर पठाण, गिरीश नागोरी, धर्मरथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, हिरामण तरटे, प्रकाश मुळीक, निशांत पाटील, जयप्रकाश महाडिक, सागर बडगुजर, तुषार सूर्यवंशी, संजय सणस, विजय बांदल, मिलिंद बडगुजर, धर्मेंद्र चौधरी, ईश्वर शिंदे, जगदीश राजपूत, प्रमोद महांगडे, सुनील महांगडे, विशाल महांगडे, विजय राठोड, ओम महांगडे, हे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष भिंताडे यांनी केले . सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. धर्मरथ फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी आभार मानले…