जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर येथील विवाहितेचा घरात काम करायला जमत नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ करून छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कुसूम सुनिल परदेशी (वय-४२) रा. भुरे मामलेदार प्लॉट शिवाजी नगर जळगाव यांचा विवाह सुनिल रघुनाथ परदेशी यांच्याशी सन १९९५ मध्ये रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नाचे सुरूवातीचे सहा महिने चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला काही कामधंदा करता येत नाही म्हणून सतत टोमणे मारणे सुरू झाले. यात पती सुनिल परदेशी यांनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तर सासु, जेठ व नणंद यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी शुक्रवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सुनिल रघुनाथ परदेशी, सासू पार्वती रघुनाथ परदेशी, जेठ शांतीलाल रघुनाथ परदेशी, ननंद रेखाबाई सुरेश चौधरी, सर्व रा. शिवाजी नगर जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ललील भदाणे करीत आहे.