जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगरमध्ये ड्रेनेजचे काम झालेले असून पावसामुळे पडलेल्या ड्रेनेजचे खड्डे मुरूमने भरून टाकावे अशी नागरिकांची मागणी पूर्ण केली जात आहे.
नागरिकांनी संबंधित नगरसेवकांकडे याबाबत तक्रारी होत्या , त्यानुसार नगरसेवक नवनाथ द्वारकुंडे यांच्यातर्फे शिवाजीनगर परिसरात खड्डे बुजविले जात आहे. जच्या ठेकेदारांना बोलवून त्यांनी सांगितले की , ड्रेनेजमुळे पडलेले खड्डे मुरूमने भरून टाकावे , तसेच काही ठिकाणी काम सुरू झालेले आहे. पावसाळ्यात लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे , त्यामुळे नागरिकांची समस्या सुटणार आहे.