चोरीच्या सात दुचाकींसह दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातून ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी दुचाकी चोरतांना रंगेहात पकडले असून दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसांपासून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक वाढल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या सुचनेनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी स.फौ. वासुदेव सोनवणे, पोहेकॉ विजय निकुंभ, बशीर तडवी, पो.ना. अक्रम शेख, गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे, पो.कॉ. रतन गिते, पो.कॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी गुप्त माहितीनुसार गुन्हेगारांना शोधण्याच्या सुचना दिल्यात.

शहर पोलीसांना दिलेल्या सुचनानुसार शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील चित्रा चौक, गोविंदा रिक्षा, कोर्ट चौक, गणेश कॉलनी परीसरात सापळा रचला, दरम्यान, शहरातील चित्रा चौकात दोन चोरटे मोटारसायकल चोरी करत असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, योगेश इंधाटे यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांना पाहून दोन चोरटे दुचाकीवरून पळ काढला. मात्र शहर पोलीसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून सात विना नंबरच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. निळकंठ सुर्यकांत राऊत (वय-४०) रा. प्लॉट एरीया, अडावद, ता. चोपडा आणि ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय-२९) रा. वडगाव ता.चोपडा अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहे.

दोन्ही संशयित आरोपीपैकी निळकंठ राऊत हा पुण्यातील रहिवाशी असून पुण्यातून दोन दुचाकी चोरी केल्या आहेत. राऊत याला पुणे व निगडी पोलीसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले असल्याने तो जळगावात राहत आहे. हस्तगत केलेल्या २ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या ७ दुचाकी ह्या जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे, धरणगाव, यावल परिसरातून चोरी केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे. दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.प्रफुल्ल धांडे आणि पो.कॉ. रतन गिते करीत आहे.

Protected Content