शिवाजीनगर परिसरात नवीन दारू विक्रीच्या दुकानास परवानगी देऊ नये ; महिलांची मागणी (व्हिडिओ )

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगर, जनाई नगर भागात हॉटेल व्यवसाय उभारून दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्ना असलेल्या व्यक्तीचा दारूचा परवाना व बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, इंद्रप्रस्थनगर, जनाई नगर, शिव शंकर कॉलनी, राधाकृष्ण नगर, दत्तात्रयनगर, त्रिभुवन कॉलनी वा भाग अतिशय शांतताप्रिय व उच्चभ्रु वस्ती असलेला भाग आहे. या भागात राहणारे वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच दोन वर्षापुर्वी राजाराम हॉल लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालयाची मागणी केलेली आहे व त्यांनी वर नमुद जागेत नुकतेच हॉटेल व्यवसाय व त्यासोबत दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार असून तसे प्रयत्न व हालचाली सुरु केलेल्या आहेत. स्थानिक रहिवाशांना सदर बांधकामाच्या अनुषंगाने अतिशय दाट लोक वस्तीचा असुन याठिकाणी खाजगी रहिवास असुन कुठल्याही व्यवासायीक वापरासाठीची जागा नाही. असे असताना यांची कायदेशीर रितसर परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राजाराम हॉलची बांधकाम करण्यात आलेले आहे तसेच वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच कॉलनीतील संबंधीत अधिकाऱ्यांना संपर्क करुन व शेजारी राहणाऱ्या लोकांकडे दारु दुकान टाकणार असल्याची माहिती परिसरातील नागरीकांना सांगून ठेवले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून आपल्या कार्यालयाकडून दारू विक्रीचा कोणताही परवाना देऊ नये, अन्यथा भविष्यात होणाऱ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे नमूद केले आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/242214977372743

 

Protected Content