जळगाव प्रतिनिधी । पैसे न दिल्याच्या कारणावरून बापलेकाला तीन जणांनी दगडासह लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिन जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संजय माधव गवांदे रा. सत्यम पार्क, दूध फेडरेशनच्या मागे हे टेलर असून त्याचे शिवाजीनगर हुडको भागता सिंधुदुर्ग या बिल्डींगमध्ये अमरसिंग मंगलसिंग पाटील यांच्या घर नं ३८ याठिकाणी काम चालते. याठिकाणी गवांदे यांच्योसाबत काम करणारे कारागिर अर्शद जमालोद्दीन अली, दानिश जावेद, परवेज, अन्वर व अयाज हे सुध्दा वास्तव्यास आहेत. १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजाजन बाविस्कर हा शिवाजीनगर हुडको येथे आला. त्याने याठिकाणी अर्शद अली यांच्यासह कारागिरांना पैशांची मागणी पैसे दिले नाही, तर याठिकाणी काम करु देणार नाही अशी धमकी देवून निघून गेला. ही बाब अर्शद अली यांनी गवांदे कळविली. त्यानुसार गवांदे आले त्यांनी गजाजन बाविस्कर याच्या घरी जावून शोध घेतला मात्र मिळून आला नाही. पुन्हा पायी येत असतांना शिवाजीनगरातील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालय येथे गजाजन बाविस्कर हा त्याच्या दोन साथीदारासोबत बसलेला होता. गवांदे यांना पाहताच बाविस्कर याने कपाटावर दगड मारुन फेकला. तर इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर बाविस्कर याने पुन्हा त्याच्या हातातील लोखंडी पट्टी डाव्या हातावर मारली. बोटाला गंभीर दुखापत केली. घटनेची माहिती मिळाल्यावर गंवादे यांचा मुलगा जयेश गवांदे हा घटनास्थळी आला. त्यालाही बाविस्कर तसेच त्याच्या दोघांनी लोखंडी पट्टीने मारहाण करुन उजव्या हाताला दुखापत केली. यानंतर जखमी गवांदे यांना जिल्हा रुग्णालयात तर मुलगा जयेश याला साकेगाव येथील डॉ उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गजानन विलास बाविस्कर याच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.