कोरपावली गावात आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नांनी रोहीत्र ; सरपंचानी केले लोकार्पण

 

यावल  प्रतिनिधी  तालुक्यातील कोरपावली गावासाठी  माजी आमदार प्रा .चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी आणि आमदार लता सोनवणे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समिती  यांचा कडून गावाला १०० केव्हीएचे नवीन रोहित्र मंजूर करण्यात आले होते त्याचे काम तात्काळ वेगाने पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या हस्ते करण्यात आले.

या लोकार्पणप्रसंगी पिरन पटेल, नारायण अडकमोल, मा. सरपंच जलील सत्तार पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, आफरोज पटेल, सिकंदर तडवी, अजित तडवी, सिराज तडवी, सिद्दीक पटेल उपस्थित होते. या कामी महावितरणचे उपअभियंता जे. के. धांडे, वायरमन अरमान तडवी, आदील पटेल, रमेश भालेराव आदींचे सहकार्य लाभले. गावात नवीन रोहित्र बसल्याने वारंवार होणाऱ्या खंडीत विद्युत पुरवठयाच्या गोंधळातुन कोरपावली परिसरातील नागरीकांची सुटका मिळणार असल्याने जनतेतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गावातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणचे परिसरातील गावकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींनी आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे विशेष आभार मानले आहे.

 

Protected Content