शिवसेनेच्या मालकीची सुनावणी : पुन्हा नवीन तारीख !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या मालकीवरून उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा पुढील तारीख दिली आहे.

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन उध्दव ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. यानंतर खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला. त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे.

या प्रकरणी आज निवडणूक आयोगात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांतर्फे जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यात ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडतांना खरी शिवसेना ही उध्दव ठाकरे यांचीच असल्याचा दावा केला. तर, एकनाथ शिंदे यांच्यातर्फे बाजू मांडतांना महेश जेठमलानी यांनी शिंदे यांच्याकडेच शिवसेनेची मालकी असल्याचा युक्तीवाद केला. दरम्यान, या प्रकरणी २० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Protected Content