शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची ईडीतर्फे चौकशी होण्याची शक्यता

मुंबई- आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एका नेत्याची सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीतर्फे चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

एबीपी-माझा या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या अजून एका मोठ्या नेत्याची ईडीतर्फे चौकशी होण्याची शक्यता आहे. अलीकडेच टॉप्स एजन्सी प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर गेल्या आठवड्यात ईडीनं धाडी टाकल्या. त्यांचे पुत्र विहंग यांची ईडीच्या अधिकार्‍यांनी चौकशीदेखील केली. त्यानंतर विहंग हे आतापर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत. या प्रकरणात प्रताप सरनाईक यांचीदेखील चौकशी होणार आहे. मात्र परदेशातून आल्यानं ते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरनाईक यांची चौकशी होणार आहे.

या घडामोडी होत असतांना यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याचं समजतं. या नेत्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची ईडीकडून मनी लॉड्रींग प्रकरणात चौकशी होऊ शकते. यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Protected Content