धरणगाव, प्रतिनिधी । येथील देवश्री रमेश महाजन हिने वेगवेगळ्या विषयांवर १० कविता लिहिल्या म्हणून शिवसेना महिला आघाडी तर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
देवश्री महाजन ही इयत्ता १० वीत शिकत असुन पोतदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव ह्या शाळेत शिकत आहे. तिला लहानपणापासून वाचनाची व लिखाणाची आवड आहे. कोरोना विषाणूंमुळे मार्च महिन्यापासून प्रत्येक शाळेला सुट्टी आहे. म्हणून तिने या तीन महिन्यांच्या सुटीच्या कालावधीमध्ये तिला विविध विषयांवर कविता लिहीण्याचा छंद जडला. तिने एक दोन नाही तर चक्क १० कविता लिहिल्या. देवश्री लहान असुन तिने समाजात भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्यावर कवितेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यत तिने कोरोना माहमारी , स्त्री भ्रूणहत्या हत्या , आई-वडील , शिक्षक ( टिचर) , मित्र ( फ़ेडस) ,या विषयावर कविता लिहिल्या.या कविता मधुन समाज जागृती व्हावी.हि तिची कल्पना होती. चिमुकलीने १५,१६ व्या वयात अशा समाज जागृतीच्या कविता लिहिल्या म्हणून शिवसेना महिला आघाडी तर्फे देवश्रीचा सत्कार करण्यात आला.बालकवी ठोंबरे विद्यालयाचे शिक्षक आर. डी. महाजन तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापिका कविता महाजन ह्याची ती मुलगी आहे. या सत्काराप्रसंगी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ,उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन,शिवसेना नगरसेविका अंजली भानुदास विसावे विसावे, किर्ती किरण मराठे, आराधना नंदलाल पाटील पाटील , कविता महाजन, मंगला चौधरी, सुनिता चौधरी, महिला आघाडी शहर प्रमुख रत्ना धनगर, हेमांगी अग्निहोत्री,भारती धनगर आदी महिला उपस्थित होत्या. या अगोदर धरणगावातील कवी संजीवकुमार सोनवणे, तसेच प्रा. बी एन चौधरी यांनी तिचे कौतुक केले. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपस्थित राहुन देवश्री महाजन ह्यांनी अजुन चांगल्या- चांगल्या कविता लिहाव्यात अशा भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.