शासकीय ‘अभियांत्रीकि’तल्या कोविड केअर सेंटरमध्ये गर्दी

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय अभियांत्रीकीच्या वसतीगृहांमध्ये असणार्‍या कोविड केअर सेंटरमध्ये आज तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रूग्ण आणि संशयित रूग्णांची गर्दी आढळून आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविल्याचे साहजीकच रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. अर्थात, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील लक्षणीय प्रमाणात वाढलेले आहे. या पार्श्‍वभूमिवर, येथील शासकीय अभियांत्रीकी विद्यालयाच्या वसतीगृहांमध्ये असणार्‍या कोविड केअर सेंटरमध्ये आज दुपारी मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. यात काही पॉझिटीव्ह रूग्ण होते. तर बरेचसे संशयित स्वॅब देण्यासाठी येथे आले होते. स्वॅब देणार्‍यांमध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा समावेश होता. यात बालकांचाही समावेश होता.

Protected Content