भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणूक संदर्भात शहरातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. शिवरायांच्या मिरवणूकीत डीजेला बंदी असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले आहे.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाजारपेठ पोलीस स्टेशनला बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या मागील वर्षी आलेल्या अडचणी मांडून ह्या वर्षी अडचण येऊ नये, यासाठी पो.नि. दिलीप भागवत यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. मिरवणुकीत घोडे तसेच सजीव देखावे करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिल्यास घोडे सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची राहणार नसून तुमची राहणार आहे. अशा अनेक विषय ऐकून त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले. तसेच शिवजयंतीच्या दिवशी तरुणांनी दारूचे सेवन करून मिरवणुकीत जाऊ नये. डीजे वाजवू नये.
वाजविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. मिरवणूकीसाठी कार्यकर्त्यांनी वेळेचे भान ठेवून रात्री १० वाजेच्या दरम्यान बंद करणे बंधनकारक आहे. अशी तंबी पो.नि निरीक्षक दिलीप भागवत यांनी हलक्या शब्दात दिली. यावेळी बैठकीला बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पो.हे.कॉ.नंदकिशोर सोनवणे, पो.ना.संदीप परदेशी, पो.कॉ.सचिन पोळ उपस्थित होते.