Home Uncategorized शिवजयंतीला महाराष्ट्र सदनात गोरखा रेजिमेंटचा अपमान

शिवजयंतीला महाराष्ट्र सदनात गोरखा रेजिमेंटचा अपमान


maharashtra sadan
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी आर्मी जवानांना कॅंटीनमधून हाकलून बाहेर काढल्यामुळे शिवजयंतीला महाराष्ट्र सदन प्रशासनाकडून गालबोट लागले आहे. कायरकर यांनी महाराष्ट्र सदनात गोरखा रेजिमेंटचा अपमान केला आहे.

 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमातही खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या जल्लोषात हा सोहळा रंगला असताना अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे शिवजयंती कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आर्मीचे विशेष बॅंड आले होते. हे जवान सकाळी ६ वाजल्यापासून महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. महाराष्ट्र सदन कॅंटीनमध्ये जेवायला बसले असताना त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. संतप्त झालेल्या शिवभक्तांची आणि कायरकर यांची झाली बाचाबाची. या जवानांना कॅन्टीनमध्ये बोलवण्यात आले होते. त्यांना जेवणासाठी ताटं वाढून ठेवले होते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला इथं जेवता येणार नाही, तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे असं सांगत त्यांना कॅन्टीनमधून बाहेर काढलं यावरुन काहीवेळ तणाव निर्माण झाला.


Protected Content

Play sound