26/11 च्या संपूर्ण घटनेची फेरचौकशी करा; भाजपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

taj attack

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलीस दलाचे निवृत्त पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात पाकिस्तानी दहशतवादी कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होता, असे लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर २६/११च्या संपूर्ण प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.

 

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,या हल्ल्याची चौकशी करण्याच्या संदर्भात तत्कालीन सरकारने निवृत्त गृह सचिव राम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल हा तत्कालीन सरकारने विधिमंडळासमोर पूर्णपणे सादर केला नव्हता. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वतः राम प्रधान यांनी हे मान्य केले की, त्या हल्ल्यात जे लोकल कनेक्शन मिळत होते ते लोकल कनेक्शन तुम्ही उघड करू नका, अशा प्रकारचा आदेश तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्याला दिला होता. तसेच आयएसआय ही दहशतवादी संघटना कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत होती, हा तत्कालीन पोलिस आयुक्तांचा खुलासा आहे ज्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्याच वेळेला या देशातले काही लोक या संदर्भाच्या दिशेने लिखाण करत होते आणि तशा प्रकारच्या मागण्या करत होते. त्यामुळे या सर्व लोकांची या संदर्भातली सखोल चौकशी करण्याची मागणी करण्याची मागणी अतुल भातखळकरांनी पत्रात केली आहे.

Protected Content