शिवरायांचा आदर्श आणि विचार आचरणात असावेत – मुख्य अभियंता कुमठेकर

jalgaon

जळगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी कारकिर्दीत चौफेर क्षेत्रात एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासह त्यांचे विचार प्रत्येकाच्या आचरणात असावेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले.

बहूजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरमच्या वतीने महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे तैलचित्राचे अनावरण श्री. कुमठेकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. फारुख शेख, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) श्री. चंद्रशेखर मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. फोरमचे केंद्रीय कार्यकारिणी सचिव श्री.बी. डी. जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमास वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) रामचंद्र वैदकर, कार्यकारी अभियंता संजय तडवी, नितीन पाटील यांच्यासह आदी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content