जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनीतील साईबाबा मंदीराजवळील एका घरातून अज्ञात चोरट्यांने तीन मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश ज्ञानदेव भारंबे (वय-१८) रा. संताजी नगर, मलकापूर ह.मु. शिवकॉलनी, जळगाव हा तरूण शिक्षणासाठी जळगावात राहतो. शनिवार २० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास घरी असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीतून ३२ हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले. दरम्यान, बाबत महेश भारंबे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता महेश भारंबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.