शिर्डी संस्थांनच्या भूमिकेवर तृप्ती देसाईंचा आक्षेप

 

नगर: वृत्तसंस्था । ‘शिर्डी मंदिरांमधील पुजारी अर्धनग्न अवस्थेत फक्त सोवळे नेसतात, त्यावर कधी आक्षेप घेतला नाही वा अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा बोर्डही लावला नाही’, असे नमूद करत संस्थानच्या निर्णयावर तीव्र आक्षेपही तृप्ती देसाई यांनी नोंदवला

संस्थानने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या आवारात पेहरावासंदर्भात लावलेला बोर्ड तातडीने काढावा. अन्यथा शिर्डीत येऊन आम्ही तो बोर्ड काढू,’ असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. ‘
.
शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे. तृप्ती देसाई यांनी तर थेट हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त श्रद्धेने देश-विदेशातून येत असतात. त्यात वेगवेगळ्या जाती-धर्माच्या साईभक्तांचा समावेश असतो. अशावेळी भक्ताने सभ्य पोषाख घालून यावे, अशा पद्धतीचा बोर्ड लावून बंधनं घालणं योग्य ठरणार नाही, असे तृप्ती देसाई यांनी नमूद केले. भारतात संविधान असून त्याने प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच कोणी काय बोलावे, कुठे कसे कपडे घालावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मंदिरात कशा पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत, याचे भान भक्तांना आहे. भक्तांचे श्रद्धास्थान हे कुठल्या कपड्यांवरून आपण ठरवू शकत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे अशा पद्धतीचा बोर्ड लावणे हा संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अपमान आहे, असा आरोपही देसाई यांनी केला.

अनेक मंदिरांत पुजारी हे अर्धनग्न असतात. ते फक्त सोवळे नेसतात. त्यामुळे ‘अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही’, असा कधी कोणत्या भक्ताने बोर्ड लावला नाही. शिर्डीच्या मंदिरात पेहरावाबाबत लावलेला बोर्ड संस्थानने तातडीने हटवावा. अन्यथा आम्ही शिर्डीत येऊन तो बोर्ड काढून टाकू, असे देसाई म्हणाल्या.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी या बोर्डबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘मंदिरात येणाऱ्या काही भाविकांच्या वेषभूषेवर भाविकांकडूनच आक्षेप घेण्यात आला होता. तशा काही तक्रारी संस्थानकडे आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन हा फलक लावण्यात आला आहे. मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे. तेथे येताना आपण सभ्यता पाळावी व भारतीय संस्कृतीचे पालन करावे, इतकाच यामागे हेतु आहे. संस्थानने भाविकांसाठी कोणताही ड्रेसकोड बंधनकारक केलेला नाही. केवळ या सूचनेचे पालन व्हावे इतकीच अपेक्षा आहे, असे बगाटे यांनी नमूद केले.

Protected Content