शिरसोली रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रस्त्यावरील असलेले एटीएम दोन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तेथील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे थेट मुंबईत अलार्म वाजला. यांनतर एमआयडीसी पोलिसांना फोन करुन माहिती देण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रायसोनी महाविद्यालयाच्या बाहेर वेगवेगळ्या बँकेचे दोन एटीएम केंद्र आहेत. १९ जून रोजी मध्यरात्री २.३० वाजता दोन चोरट्यांनी यातील एका एटीएम केंद्रात प्रवेश केला. एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लांबवण्याच्या तयारीत चोरटे होते. यासाठी त्योनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. असे करताच अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे थेट संबधित बँकेच्या मुंबई कार्यालयात अलार्म वाजला. यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन करुन माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रायसोनी महाविद्यालयाजवळ पोहोचले होते. दरम्यान, अलार्म वाजल्याचा संशय आल्यामुळे चोरट्यांनीही तेथुन पळ काढला होता. पोलिसांनी एटीएमची पाहणी करुन संबधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यांच्याकडून मशीन न फुटल्यामुळे त्यातील रोकड सुरक्षीत राहिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content