शिरसोलीत घरगुती गॅसचा काळाबाजार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र न येथे घरगुती गॅसचा वापर बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरुन गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकाजणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत काळाबाजार करणाऱ्याला अटक केली आहे. शरीफ शेख शफीउद्दीन वय ४५ रा. मलीक नगर, शिरसोली प्र.न असे अटकेतील संशयिताचे नाव अहे

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील मलीक नगर येथे शरीफ शेख शफीउद्दीन वय ४५ हा रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅसचा वाहनांमध्ये गॅसभरमण्यासाठी वापर करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास शिरसोलीत जावून मलीक नगर येथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गॅस सिलेंडर व एक वजनकाटा असा एकूण १३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक समाधान टहाकळे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुनहा दाखल आला असून संशयित शरीफ शेख शफीउद्दीन शेख यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

Protected Content