जळगावात विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रूपयांचा दंड (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गेल्या पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यातच जळगाव शहरातही संख्या अधिक प्रमाणावर वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये प्रत्येक नागरीकाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहर वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या पथकाने शहरातील घाणेकर चौक, बसस्थानक, भजेगल्ली, काव्यरत्नावली चौक, कोचींग सेंटर, अभ्यासिका केंद्र, सुभाष चौक या परिसरात धडक कारवाई केली आहे. 

https://www.facebook.com/508992935887325/videos/538416387136146

 

Protected Content