अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील,शिरसाळे विकासो सोसायटीची चेअरमन निवड बिनविरोध पार पडली. यात चेअरमनपदी दिनेश अशोक पाटील तर व्हाईस चेअरमनपदी भरत शांताराम चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
ग्रामपंचायत कार्यालय शिरसाळे येथे विकासो चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी सर्व निर्वाचित सदस्य हजर होते. यात आनंदा पुना पाटील, अशोक बळीराम पाटील, कोमल नाना पाटील, फारुख अल्लाउद्दीन खाटीक, प्रदीप दगडू कोळी, युवराज श्रावण चौधरी, मिनाबाई छोटू पाटील, मालुबाई विलास पाटील, आशाबाई कैलास महाले, सीताबाई बाबूलाल पवार, जिजाबाई जगतराव पाटील यांचा समवेश होता. या सर्वानी चेअरमन दिनेश अशोक पाटील तसेच व्हाईस चेअरमन भरत शांताराम चौधरी यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी आर. यु. पाटील होते. यावेळी संजय रामचंद्र शिरोळे, रामलाल वंजी पाटील, युवराज भाऊराव पाटील, सुदाम शांताराम चौधरी, ज्ञानेश्वर दिलबर पाटील, गोरख रावण पाटील, विनायक सोमा पाटील व सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच उपस्थित होते.