जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्घुण हत्या करण्यात आली याचा विश्व हिंदू परिषदच्या वतीने निषेध व्यक्त करत या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देवून करण्यात आली..
निवेदनाचा आशय असा की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी विष पसरवण्याचे कार्य केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे शिमगो येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या आहे. या दुर्दैवी घटनेतील आरोपींना जरब बसेल अशी शिक्षा व्हावी. सिमीचे दुसरे रूप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, गेट ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी. या संघटनांची पाळेमुळे महाराष्ट्रातील रुजलेले आहेत. त्यावर बंदी घालून योग्य बंदोबस्त करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद संविधानिक मार्गाने याला प्रत्युत्तर देईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळेभाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा मंत्री श्रीराम बारी. विभाग संयोजक बजरंग दल राकेश लोहार, बंटी बाविस्कर, राजेंद्र नन्नवरे, हिंदूराष्ट्र सेनेचे मोहन तिवारी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1013301092619269