शिक्षक दिनानिमित्त डॉ.उल्हास पाटील यांचा सन्मान 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शिक्षक दिनानिमित्त सोमवार, ५ सप्टेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच फिजीओथेरपी महाविद्यालय उघडून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आणि शेकडो शिक्षकांसाठी अध्यनाची कवाडे उघडून दिली याबद्दल सर्वात मोठे शिक्षक डॉ.उल्हास पाटील यांच्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आदर व्यक्‍त केला, तसेच आशिर्वादही घेतले.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ.जयवंत नागुलकर, अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर राहुल गिरी, डॉ.चित्रा म्रिधा, डॉ.पूर्णा देवी, डॉ.अनुराग मेहता, डॉ. निखिल पाटील, डॉ.भवानी राणा, डॉ.मुकेश शिंदे, डॉ.चैताली नेवे, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ. दिपाली पाटील, भारती चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content