पाचोरा : प्रतिनिधी । पोलिसांनी शिंदाड पिंपरी जवळच्या गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून ७५ हजारांची दारू जप्त करून ४ आरोपींना अटक केली
पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत काही गावांमध्ये गावठी दारू विक्री सुरू होती. त्यामुळे शिंदाड पिंप्री येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी 75 हजार रुपयांचे गावठी दारू आणि रसायन जप्त केले. चार संशयितांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक नीता कायटे, सहायक फौजदार डिगंबर थोरात, हवालदार रंजीत पाटील, पो कॉ अरुण राजपूत, संदीप राजपूत, सचिन वाघ यांनी गुरुवारी पहाटे पिंप्री येथील धरणाच्या किनार्यावर छापा टाकून ही कारवाई केली. पिरखा बाबुलाल तडवी (वय 28), जाबिर शेणपडू तडवी (वय 28) , अनिल मासूम तडवी व भुरा रफिक तडवी यांना ताब्यात घेतले आहे