अबूधाबी : वृत्तसंस्था । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला मानहानीला सामोरं जावं लागलं. दुबईत गेलेल्या आफ्रिदीला विमानतळावरुनच पाकिस्तानला पाठवण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला आफ्रिदी अजूनही विविध स्पर्धांमधून मैदानात उतरतो. मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात, जसे टी 20, T10 सामन्यांमध्ये अजूनही आफ्रिदीला मागणी आहे. अबूधाबीमध्ये टी 10 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आफ्रिदी तिथे गेला होता. मात्र आफिद्रीला एअरपोर्टरवरुनच पाकिस्तानला परत पाठवण्यात आलं.
टी 10 लीगच्या चौथ्या हंगामात दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. जसे ड्वेन ब्राव्हो, ख्रिस लीन, मोहम्मद शहजाद यासारखी बडी नावं मैदानात उतरत आहेत.
अबू धाबी टी 10 क्रिकेट लीगच्या चौथ्या हंगामाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या लीगमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू सहभागी होतात. 8 संघामध्ये 29 सामने खेळवण्यात येणार आहेत. केवळ 10-10 षटकांच्या सामन्यात धावांचा पाऊस पडतो. या लीगची फायनल 6 फेब्रुवारीला शेख जायेद स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
शाहीद आफ्रिदी बुधवारी पाकिस्तानातून अबूधाबीला पोहोचला. विमानतळावर पोहोचल्यानंतर, आफ्रिदीला आपली व्हिजा मुदत संपल्याची कल्पना आली. मुदत संपल्यामुळे आफ्रिदीला तिथूनच थेट पाकिस्तानला पाठवण्यात आलं. आता आफ्रिदी व्हिजा अपडेट करुन पुन्हा अबूधाबीला जाणार आहे.
T20 लीगमधील पहिला सामना 28 जानेवारीला खेळवण्यात येत आहे. मराठा अरेबियन्स विरुद्ध नॉर्थन वॉरियर्स यांच्या हा सामना होत आहे. या लीगमध्ये सर्व सामने अबूधाबीतील शेख जाएद मैदानात खेळवण्यात येणार आहेत. वर्ष 2017 पासून पहिल्यांदा T10 लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. केरला किंग्जने त्यावेळी जेतेपद पटकावलं होतं.