भारताचे ‘मिराज’ पाहून पाकिस्तानी विमाने पळाली

download 5

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या मिराज या विमानांचा आकार आणि त्यांच्याकडून होत असलेला हल्ला पाहून पाकिस्तानची लढाऊ विमाने पळून गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

भारताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली. भारताच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांच्या ताफ्याने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या एफ16 विमानांचा ताफा भारताच्या ताफ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आकाशात झेपावला. परंतु भारतीय विमानांचा ताफा, भारताकडील स्फोटकांच्या साठा आणि मिराज 2000 विमानांची क्षमता पाहून पाकिस्तानची विमाने परत फिरली. मिराजची क्षमता पाहून घाबरलेला पाकिस्तानच्या एफ16 विमानांचा ताफा माघारी परतला. पाकिस्तान मिराजच्या प्रत्युत्तरासाठी पुढे आलाच नाही. या घटनेने भारतीय वायू सेनेची ताकद, मिराज 2000 (वज्र)या लढाऊ विमानांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. जगातल्या चौथ्या मोठ्या हवाई दलासमोर आपला टिकाव लागणार नाही. हे लक्षात आल्यावर पाकिस्तानची विमान घाबरली. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी केलेल्या या कारवाईबद्दल मिराज विमानांची चर्चा होत आहे. तर भारताचा हा हल्ला किती तीव्र होता हे यातून दिसते.

Add Comment

Protected Content