यावल, प्रतिनिधी । शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिंकाचे किटनाशकांपासुन संरक्षण करावयाचे असल्यास त्यांनी सेंद्रिय मार्गाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातुन सातत्याने दिल्या जाणाऱ्या शेती पिकपेरणीच्या मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीरातील माहितीही आत्मसात करावी असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केले. ते कौशल्य विकास आधारीत शेतमजुराचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात बोलत होते.
यावल तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आज दि. १३ ऑगस्ट रोजी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कौशल्य विकास आधारीत शेतमजुरांचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई चन्द्रकांत सोनवणे , यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार ( मुन्ना ) पाटील , यावल पंचायत समितीच्या सभापती .पल्लवी पुरूजीत चौधरी , शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख रवी सोनवणे, शिवसेनेचे नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे, शिवसेनेचे शरद कोळी , जगदीश कवडीवाले , संतोष खर्चे यांच्या सह अन्य कार्यकर्ते पदधिकारी या प्रशिक्षण वर्गास प्रामुख्याने उपस्थित होते . दरम्यान रावेर तालुक्यातील पाल येथील सातपुडा विकास मंडळ संचालीत कृषी विज्ञान केन्द्राचे पिक संरक्षण विशेषज्ञ महेश महाजन यांनी प्रशिक्षण वर्गात सहभागी सुमारे ४० शेतकरी व शेतमजुरांना जैविक बुरशीनाशके व किडनाशके वापरणे काळाजी गरज असल्याचे सांगुन जिवाणु खतांचे प्रकार व उपयोग या विषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रस्तावना व सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले.