हिंगोणा येथील जलकुंभाचे काम निकृष्ठ; चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावातील मंजूर झालेले जलकुंभाचे काम प्रलंबित असून आत्तापर्यंत केलेले काम निकृष्ठ दर्जाचे असून केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी हिंगोणेकरांनी केली आहे.

हिंगोणा गावातील बाजार चौकाच्या मागच्या बाजूला गावाच्या पाणीपुरवठा समस्याचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे, या दृष्टीकोणातुन मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत जलकुंभ (पाण्याची टाकी) चे काम सुरू आहे. सदरचे काम ई-टेंडरच्या नियमानुसार १८ महिन्याच्या आत संबधीत ठेकेदारास पुर्ण करणे हे अपेक्षीत होते. परंतु सदर टाकीचे बांधकामे बंद असल्याने तसेच या टाकीचे काम निष्कृट दर्जाचे होत असल्याने अनेक वेळा ग्रामस्थांच्या तक्रारी या टाकीच्या कामाबद्दल वरीष्ठाकडे ग्रामस्थानी वेळोवेळी केल्या आहे, तरी देखील आजपर्यंत कोणतीही चौकशी संबधीत अधिकाऱ्यांकडून झालेली दिसत नाही. सदरचे काम हे संबधीत ठेकेदाराकडुन बेजबाबदारीने होत असून ठेकेदार व संबधित विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने आणी मर्जी प्रमाणे वाटेल त्या पद्धतीने काम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच काही मंडळींचे या कामात काही मिली भगत व साटेलोटे असल्याचे ग्रामस्थानं कडून बोलले जात आहे. या करिता या पाण्याच्या टाकीचे काम पुनश्च सुरू करून चांगल्या प्रतिचे व गुणंवतेच्या सिंमेट व रेती आवश्यक साहीत्याचे वापर करावा जेणेकरून भविष्यात या जलकुंभामुळे काही अप्रीय घटना होवुन जीवीत हानी होणार नाही याची काळजी घेणे कर्तव्याचे आहे, अशी मागणी हिंगोणा ग्रामस्थांकडुन होत आहे.

वर्कऑर्डर नुसार दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास मुदत वाढीचा प्रस्ताव ठेकेदाराने दिला आहे. तरी कामाचे देहक मक्तेदाराला एकही अदा केलेले नाही. सदर मुदत संपल्यावर जेवढा विलंब होईल तेवढया दिवसाचे शासकीय नियमानुसार दंड संबधीत ठेकेदाराका करण्यात येईल अशी माहीती सुरवाडे शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यावल यांनी दिली आहे.

Protected Content