शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी फिरता चित्ररथ तसेच एलईडी चित्ररथ तयार करण्यात आला आहे शनिवारी 4 मार्च रोजी दुपारी 1 वाजता या चित्ररथांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी जनजागृती व्हावी, याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण व विशेष घटक योजनेतून या चित्ररथांची निर्मिती केली आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहाय्यक नियोजन अधिकारी योगेश बावीस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी फिरता चित्ररथ आणि एलईडी ही चांगली संकल्पना आहे. चित्ररथ व एलईडीच्या माध्यमातून योजनांची माहिती अधिक सुलभपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी चित्ररथ व एलईडी चित्ररथाची संकल्पना सांगितली.

यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे चित्ररथ, एलईडीबरोबरच कलापथके, आकाशवाणी, एफएम रेडिओवर ऑडियो जिंगल्स, व्हिडीओच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

Protected Content