जळगाव प्रतिनिधी। जळगावातील मराठे परिवारातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास सामाजिक कृतज्ञता म्हणून दोन स्ट्रेचर शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी भेट देण्यात आले. त्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
द्वारकाबाई गोवर्धन मराठे (मते) यांच्या तिसऱ्या स्मरणार्थ मराठे परिवाराने रुग्णसेवेच्या हेतूने दोन स्ट्रेचर भेट दिले. या स्ट्रेचरच्या लोकार्पणप्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, अधिसेविका कविता नेतकर, डॉ. किशोर इंगोले, डॉ. नितीन विसपुते, सुरेखा लष्करे, बापू बागलाणे, विश्वजीत चौधरी, अशोक मराठे, बाळासाहेब मराठे, शालीग्राम मराठे, विष्णू बाळदे, जगदीश वाघ, जगन्नाथ पाटील, संजय अहिरे आदी उपस्थित होते.