शाळा सुरु करण्यासाठी पालकांच्या मतांचे सर्व्हेक्षण

 

जळगाव, प्रतिनिधी । राज्य सरकारच्या शिक्षण कहत्याने शाळा सुरु करण्यासाठी पालकांच्या मतांचे सर्व्हेक्षण  सुरु केले आहे

 

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. पण आता सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने सरकारने आता शाळा सुरू करायच्या की नाही यासाठी थेट पालकांची मते विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे.  शालेय शिक्षण विभागातर्फे एक प्रश्नावली तयार करण्यात आली असून ही प्रश्नावली पालकांनी १२  जुलैच्या आत भरुन पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 

राज्यातील सर्व पालक व शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. जुलैपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहील. या सर्वेक्षणात मत नोंदविण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आवाहन केले आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.८ वी ते १२ वी चे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण १२ जुलैरोजी रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहील. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

सर्वेक्षण लिंक : http://www.maa.ac.in/survey

 

Protected Content