शाळा बंद आंदोलनास पी.टी.सी.चा पाठिंबा

 

पाचोरा, प्रतिनिधी । शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याचा आदेश काढला असून या आदेशला विरोध करण्यासाठी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने पाठिंबा दिला असून संस्थेच्या गो. से. हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून निषेध व्यक्त केला.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज शुक्रवार दि. १८ रोजी सकाळी गो. से. शाळेत एकत्र येऊन काळी फित लावून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दि. ११ डिसेंबर २०२० रोजी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याबाबत काढलेला शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून या शासन निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. प्रत्येक शाळेत शिपाई असणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केले. संस्था चालकांना शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, कार्यालय प्रमुख अजय सिनकर यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content