विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण ; आरोपी मुख्याध्यापकाला जन्मठेप

 

Rape Child crime

यवतमाळ (वृत्तसंस्था) बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे 2017 मध्ये शाळकरी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी मुख्याध्यापक बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील शाळेत कार्यरत होता. 2017मध्ये पीडित विद्यार्थीनीने शाळेतून घरी आल्यानंतर गुप्तांग दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यावेळी आईने त्याकडे दुर्लक्षं केले. परंतु, पीडित मुलगी दररोज तक्रार करू लागल्यानंतर आईने तिची विचारपूस केली. त्यावेळी दोषी मुख्याध्यापकाचे कृत्य उघड झाले होते. त्यानंतर शाळेतील इतर विद्यार्थीनींसोबतही हाच प्रकार घडला असल्याचे उघड झाले होते. दुसऱ्याच दिवशी पीडित विद्यार्थीनीने आईसोबत बाभूळगाव पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली होती.

Protected Content