जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराची हद्द वाढविण्यात यावी असा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आला असता याला शिवसेना व एमआयएम यांनी विरोध दर्शविल्याने हा प्रस्ताव संख्या बळाच्या जोरावर भाजपने बहुमताने मंजूर केला.
जळगाव महापालिकेच्या हद्दीत शहरा लागतच्या मन्यारखेडा, कुसुंबा, सावखेडा, मोहाडी, आव्हाणा गावांचा समावेश करण्यात यावा अशा प्रस्ताव महासभेत स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी व इतर चार सदस्यांनी सभागृहात मांडला. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी महापालिका शहरातील नागरिकांना पुरेशा सुविधा देऊ शकत नसतांना हद्दीत वाढ करू नये अशी मागणी केली. याला प्रस्तावास एमआयएमचे रियाज बागवान यांनी देखील विरोध केला. मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1156885221414511