शहरात सिंधी पंचायतीतर्फे वृक्षारोपण

जळगाव, प्रतिनिधी ।  जळगाव शहर पुज्य सिंधी पंचायततर्फे गायत्री नगर  व एमआयडीसी  परिसरातील विविध भागात माजी आमदार गुरुमुखदास जगवानी व पुज्य पंचायतचे अध्यक्ष सितलदास जवाहरानी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

 

जळगाव शहर पूज्य सिंधी पंचायततर्फे गायत्री नगर,  मे. चिमनदास वलीराम, डी-६१, एम.आय.डी.सी., मे. ऑडिकोन इंडस्ट्रीज, एफ – १०, एम.आय.डी.सी. येथे मा. आ. गुरुमुखदास जगवानी व पुज्य पंचायतचे अध्यक्ष सितलदास जवाहरानी यांच्या हस्ते ट्री गार्डसह ६० वृक्षांचे रोपण करण्यात आले.  याप्रसंगी पुज्य पंचायतचे जेष्ठ सदस्य कन्हैयालाल लाहोरी, चंद्रकांत आडवानी, कमलेश वासवानी, नारायन मंगलानी, प्रदिप आहुजा, संतोष चेलानी व अशोक रुपचंदानी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख किशोर बेहरानी व नारायन लाहोरी होते. यशस्वितेसाठी राजेश जवाहरानी, राहुल खटवानी, राजेश भागवानी, हेमंत रंगठा, जितेन्द्र भोजवानी, रमेश भागवानी,घनशाम भागवानी, धीरज भागवानी यांनी कामकाज पहिले. आभार सचिव कमलेश वासवानी यांनी मानले.

 

Protected Content