शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) दुसऱ्या पक्षातील प्रमुख लोकांना सल्ला देण्याचे काम माझे नाही. सामना एक वृत्तपत्र आहे. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचे काम मी करत असतो. तो शरद पवार यांच्या कुटुंबातील अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये. शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचे नातू पार्थ पवार यांच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले की, शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. यावरुन इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचे काही कारण नाही. त्यांनी चिंता करु नये. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यांनाच पाहू द्या. खरंतर तो विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. तो शरद पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये. शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. मला वाटते पवार कुटुंब आणि त्यांचा पक्ष हे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठीही ते सक्षम आहेत. त्याविषयावर त्या पक्षाचेच प्रवक्ते बोलतील, असेही राऊत म्हणाले.

Protected Content