व. वा. वाचनालयात आजपासून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

 

जळगाव (प्रतिनिधी) नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, मानव संसाधन विकास मंत्रालय, शिक्षण विभाग, भारत सरकार यांचेतर्फे वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव येथे दिनांक 29 फेब्रुवारी ते 6 मार्च, 2020 या कालावधीत पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 अशी आहे.

या पुस्तक प्रदर्शनामध्ये मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहे. तरी या पुस्तक प्रदर्शनास भेट द्यावी व उपयुक्त अशी पुस्तके खरेदी करावी. असे आवाहन राष्ट्रीय पुस्तक न्यासचे श्री. रविंद्र रा. मोहोड, प्रदर्शन प्रभारी यांनी केले आहे.

Protected Content