जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । व्हाट्सअप आणि फेसबुकवर बनावट खाते तयार करून जामनेर तालुक्यातील एका महिलेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथील महिला आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीने ३० जून ते १९ ऑगस्ट दरम्यान महिलेच्या नावाचे बनावट व्हाट्सअप अकाउंट व फेसबुक अकाउंट तयार करून फोटो अपलोड केले. या फोटोच्या माध्यमातून तिची बदनामी करण्यात आली. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्याने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्त विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.