व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी महेश वाणी

 

यावल  : प्रतिनिधी ।  येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेडची सर्वसाधारण वार्षीक सभा झाली  बॅंकेच्या उपाध्यक्षपदी महेश वासुदेव वाणी यांची निवड करण्यात आली आहे .

 

आज येथे बँकेचे अध्यक्ष शरद यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नुतन कार्यकारीणीची सभा २२ एप्रिलरोजी झाली . या सभेत सन २०२१ – २२ या कालावधीसाठी उपाध्यक्षपदी महेश वाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

 

बँकेच्या या वर्षीक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष शरद यावलकर, डॉ .सतीष यावलकर, हेमंत चौधरी , अभिमन्यु बडगुजर , जगदिश कवडीवाले , किरण अट्रावलकर , यशवंत सोनवणे , दिलीप नेवे ,  सुनिता गडे , बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत वाणी व सर्व कर्मचारी  ऊपस्थीत होते .

सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे हित जोपासुन प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन उपाध्यक्ष  महेश वाणी यांनी निवडप्रसंगी सांगीतले .  निवड झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला

Protected Content