कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी ।   मुक्ताईनगरच्या कोविड सेंटरवरचा तन कमी व्हावा म्हणून कुऱ्हा काकोडा येथे स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी तालुका  राष्ट्रवादी कॉंग्रेसने तहसीलदारांकडे केली आहे

 

कोविड १९चा वाढता संसर्ग पाहता मुक्ताईनगर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. मुक्ताईनगरच्या कोविड सेंटरमध्ये संपुर्ण तालुक्याबरोबरच  बोदवड, रावेर, मलकापूर, मोताळा या तालुक्यातील पेशंटसुद्धा उपचारासाठी येत आहे  त्यामुळे मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर पुर्ण क्षमतेने भरले  आहे

म्हणून  तालुका प्रशासनाने कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर सुरू केले तर मुक्ताईनगर येथील कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊन कुऱ्हा परिसरातील रुग्णांना फायदा होईल यासाठी कुऱ्हा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती  पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे, जिल्हा सरचिटणीस ईश्वर  रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील  , प्रदिप भाऊ , ह भ प विशाल महाराज खोले, माफदा अध्यक्ष रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शाहिद खान, सुनिल काटे, रउफ खान, मनोज हिवरकर, दादाराव गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते

 

राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की कुऱ्हा काकोडा येथे सेंटर सुरू झाले तर कुऱ्हा, वढोदा, जोंधनखेडा, हिवरा, हलखेडा, उमरा, व पश्चिमेकडे डोलारखेडापर्यंतच्या भागातील रुग्णांना  मदत होऊन वाढता संसर्ग थांबवता येईल. कुऱ्हा येथे कोविड सेंटर उभारणीला लागणाऱ्या साधन सामुग्रीसाठी  आम्ही लोकसहभागातून  मदत करण्यास सहकार्य करु.  कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर  सुरू करावे. वाढता संसर्ग व दुर्गम भागातील पेशंटला होणारा रात्र अपरात्रीचा त्रास थांबवावा

Protected Content