जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड तांडा येथे वादातून वेल्डींग कामगार तरुणासह त्याच्या दोन भावंडांना तीन ते चार जणांनी लाथाबुक्क्यांसह काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धानवड तांडा येथे पालू जालम चव्हाण वय २८ हा तरुण कुटुंबासह राहतो. बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गावात असतांना, पालू जालम चव्हाण याला उद्देशून गावातील राजकुवर किसन राठोड याच्या इतर तीन जण तु जास्त मस्ती आला आहे, असे म्हटले, यावर पालू चव्हाण याने काय झालं अस विचारले असता त्याचा राग आल्याने राजकुवर याने पालू याच्या पोटावर तोंडावर काठीने मारहाण केली, पालू याचा भाऊ शामराव चव्हाण व दिलीप चव्हाण हे दोघे भांडण सोडविण्यासाठी त्यांना निलेश प्रभाकर राठोड, पोपट उखा राठोड व किसन उखा राठोड या तीन जणांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, या दिलीप चव्हाण याचे रक्त निघेपर्यंत त्याला मारहाण केली घटनेत तीघेही जखमी असून याप्रकरणी पालू चव्हाण याच्या तक्रारीवरुन गुरुवारी राजकुवर राठोड, निलेश राठोड, पोपट राठोड, किसन राठोड या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी हे करीत आहेत.