पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे महिलेच्या घरात घुसून तिच्या हातातून सोन्याची मंगलपोत व दागिने असा एकूण ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यमुनाबाई नारायण महाजन (वय-७५) रा. यमुना नगर, पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वृध्द महिलाही घरी एकटी असताना गावात राहणारा नाझीम बागवान हा त्यांच्या घरी आला. म्हणाला की, फळबागाचे विम्याचे पैसे आले आहे, असे सांगून त्यांच्या हातातील सोन्याची मंगलपोत व करम फुले असा एकूण ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून पळ काढला. या संदर्भात यमुनाबाई महाजन यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नाझीम बागवान रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.