जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नातीला जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पोत कागदावर ठेव असे सांगून हातचालाखी करीत ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविल्याची घटना नूतन मराठा महाविद्यालय परिसरात घडली. याप्रकरणी गुरूवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अअधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील कमलाबाई रामचंद्र सोनवणे या वृद्ध महिला कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. जळगावात राहणारी त्यांची नात हीला बाळंतपणासाठी शाहूनगरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कमलबाई या नातीकरीता जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या. डबा देवून साडेबारावाजेच्या सुमारास त्या पायी घराकडे जाण्याठी निघाल्या. याचवेळी नूतन मरठा महाविद्यालयाच्या रोडवरील युनिल अकॅडमकीजवळ त्यांना दोन अनोळखी इसमांनी थांबविले. त्यातील एक जणाने तुझे घरी लक्ष्मी आली असून तू भाग्यशाली आहे. तुला दम लागला असेल तर म्हणून त्यांनी वृद्धेला बाजूला असलेल्या पायरीवर बसविले. त्यानंतर दुनियादारी चांगली नाही, तुझ्या गळ्यातील पोत कागदावर ठेव आणि घरी गेल्यावरच उघड असे त्यांनी वृद्धेला सांगितले. त्यानुसार वृद्धेने गळ्यातील पोत काढून कागदावर ठेवत वृद्ध महिला पून्हा शाहूनगर परिसरातील हॉस्पिटलमध्ये गेली. यावेळी तीने हातातील पुडी आपल्या नातीकडे दिली. त्यांनी पुडी उघडून बघितली असता त्यांना पुडीत ठेवलेली सोन्याची पोत दिसून आली नाही. आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर वृद्धेने गुरूवारी १२ जानेवारी रेाजी सकाळी १० वाजता शहर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.